ETV Bharat / state

Pune Crime : पती सेक्स करत नसल्याने पत्नीची पोलिसात तक्रार; संबंध ठेवण्यात असमर्थ असल्याने... - पत्नीची पतीविरोधात पोलिसात तक्रार

पुण्यामधील चंदननगर भागामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला आठ महिने होऊनसुद्धा पती आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवत नाही. विचारायला गेल्यानंतर पती शिवीगाळ व मारहाण करतो, अशी तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यात केली आहे. सध्या या प्रकरणाता पोलीस अधिक तपास करत आहेत.

police
पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 9, 2023, 8:39 PM IST

Updated : Feb 9, 2023, 9:27 PM IST

पुणे - चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये पत्नीने आपल्या पतीसह इतर दोघांविरोधामध्ये तक्रार दिली आहे. अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेचे लग्न होऊन आठ महिने झाले आहे. लग्नाच्या आठ महिन्यानंतरसुद्धा पती आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही. म्हणून या महिलेने पतीकडे विचारणा केली. मात्र, पतीने शिवीगाळ करून तिला मारहाण केली, असे या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहे. त्यानंतर या प्रकरणाबाबत सखोल माहिती पोलिसांकडून प्राप्त होणार आहे.

काय आहे प्रकरण? - याबाबत अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत. पुण्यामधील हा धक्कादायक प्रकार ऐकून पोलीससुद्धा चकित झाले आहेत. पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत. या महिलेने थेट अशी तक्रार केल्याने या तक्रारीची चर्चा मात्र सध्या पुण्यात होताना दिसत आहे.

काय आहे तक्रारीत? - तक्रारीमध्ये असे नमूद आहे की, संबंधित व्यक्ती हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे हे माझ्यापासून आणि माझ्या माहेरच्या लोकांपासून लपवून ठेवले. याची माहिती कुठेही होऊ नये म्हणून पतीने शिवीगाळ व मारहाण केली आणि मला न बोलण्यासाठी धमकावून, माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार चंदन नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

गुजरातमध्येही घडला होता असाच प्रकार - काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार गुजरातमध्ये उघडकीस आला होता. ३४ वर्षीय महिलेने आपल्या भारतीय अनिवासी अर्थात एनआरआय पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. वर्षभरापासून पतीने आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीत, असा आरोप पत्नीने केला होता. दरम्यान, मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये पती-पत्नीच्या संबंधाचे विचित्र प्रकरण समोर आले होते. अश्लील व्हिडिओ दाखवून पती 'अनैसर्गिक सेक्स' करत असल्याची तक्रार पत्नीने पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरु केला होता. मागील काही वर्षांपासून शारीरिक संबंधांपासून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

Last Updated : Feb 9, 2023, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.