पिंपरी-चिंचवड(पुणे) - सरकार आणि नवाब मलिक यांना शाहरुख खानच्या मुलाचा पुळका का आला? आर्यन खानला जामीन होत नाही तर यांची तडफड का होत आहे?, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील महिला अत्याचार, शेतकरी प्रश्नांवर न बोलता सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीकाही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.
हेही वाचा - VIDEO : चंद्रकांत पाटलांना आपल्या संस्कृतीचा विसर; शरद पवारांच्या एकेरी उल्लेखावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- अजित पवारांची चौकशी झाली पाहिजे -
चंद्रकांत पाटील म्हणाले की, विकलेले 64 साखर कारखाने आणि जरंडेश्वर हे दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहेत. जरंडेश्वर प्रकरणात मनी लाँड्रिंग झालेली आहे. खोट्या कंपन्या उभ्या करून काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. अजित पवार यांचीदेखील चौकशी व्हायला हवी.
- मनसेसोबत युती नाही - पाटील
पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला शरद पवारांना यावं लागतं. दोन - दोन पवार येतायत त्यांच्यावर ही वेळ आली. याचा अर्थ आम्ही समर्थ आहोत आणि आम्हीच महापालिका जिंकणार. महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युतीची आमची शक्यता नाही, कारण त्यांचा परप्रांतीय मुद्दा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना छेद देणारा आहे.
हेही वाचा - सरकार जाणार म्हणून शाहरुख खानची वकिली स्वीकारली; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना टोला