ETV Bharat / state

Maharashtra Kesari : कोण होणार महाराष्ट्र केसरी? कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक यांच्यात कडवी झुंझ - हर्षवर्धन सदगीर समीर शेख यांच्यात लढत

कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक यांनी दिवंगत मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी मालिका सुरू ठेवली आहे. पूर्व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, बुलढाण्याचा समीर शेख यांच्यात लढत झाली. सदगीरने समीर शेखला चितपट करीत 3-0 असा पराभव केला.

Maharashtra Kesari
Maharashtra Kesari
author img

By

Published : Jan 12, 2023, 11:13 PM IST

पुणे - कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर, पैलवान बाला रफिक यांची विजयाच्या दिशेने आगेकुच सुरु आहे.पूर्व महाराष्ट्र केसरी तसेच नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने बुलढाण्याच्या समीर शेखला झुंझ देत 3-0 ने पराभव केला.

कुस्तीचा डाव रंगला - अखेरच्या क्षणी समीरने हर्षवर्धनवर दुहेरी पट टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदगीरने बचाव करत विजय मिळवून चौथ्या फेरीत प्रवेश केला. हर्षवर्धन सदगीर तसेच समीर शेख यांच्यात मॅटवर तर बाला रफिक शेख तसेच संतोष मुलानी यांच्यात मातीमध्ये एकच वेळी कुस्तीचा डाव रंगला होता.

समीर शेखचा पराभव - समीर शेख तसेच बाला रफिक शेख हे दोघे भाऊ एकाच वेळी माती विभागात आपली ताकद आजमावत होते. त्यांची खेळी पाहून उपस्थित प्रेकक्षकांनीही त्यांचे ताळ्याच्या गजरात स्वागत केले. मात्र, समीर शेखला यात पराभव पतकरावा लागला.

मैदानात कडवी झुंझ - सदगीरप्रमाणेच गादी विभागात बुलढण्याच्या समीर शेखने नाशिक शहराच्या कार्तिक गवईला, तर वाशीमच्या वैभव माने याने परभणीच्या धनराज नवघरे यांना चितपट केले. रत्नगीरीचा दादूमिया मुलाणी तसेच पुणे जिल्ह्याच्या आकाश रानावडे यांच्यातील चुरशीच्या लढतीत मुलाणीने रानवडेला पराभूत केले. वर्धाचा संतोष जगताप गैरहजर राहिल्याने अक्षय मंगवडेने पुढील फेरीत प्रवेश केला. बीडच्या अक्षय शिंदे तसेच मुंबईच्या अनिकेत मंगडे यांच्यातही जोरदार लढत झाली.

विजयचा गुलाल उधळला - अक्षयने उत्तम खेळ करत अनिकेतला धुळ चारली. पुण्याच्या तुषार दुबे तसेच तुषार वरखंडे या दोन मल्लांमध्ये झालेल्या लढतीत दुबेने विजय मिळवला. पिंपरी चिंचवडच्या शेखर शिंदेने औरंगाबादच्या मेघनाथ शिंदेला पराभूत करत विजयचा गुलाल उधळला. माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने नांदेडच्या अनिल जाधवला ५-० अशा फरकाने पराभूत केले. २०१९ चा उपमहाराष्ट्र केसरी, लातूरचा मल्ल शैलेश शेळके याने परभणीच्या राकेश देशमुखला धूळ चारली. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने एकतर्फी लढत देत आतिक शेख याचा १०-० असा दणदणीत पराभव केला.

काटे की टक्कर - गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील तसेच पुणे शहराचा पैलवान हर्षद कोकाटे यांच्यात अतिशय तुळशीची अशी लढत झाली. हर्षद कोकाटेने भक्कम अशी आघाडी घेत लढतीवर पकड मिळवली उत्तरात पृथ्वीराज पाटीलने आक्रमक खेळी करत मध्यंतरापूर्वी तीन गुणांची कमाई केली. काटे की टक्कर झालेल्या कुस्तीमध्ये कोकाटे, पृथ्वीराज पाटील दोघेही एकमेकांना वरचढ ठरत होते. दोन्ही दोन्ही कुस्तीगिरांना पाठीराखांकडून चेहरा केले जात होते.

पहिल्या राउंडमध्ये चार तीन अशी आघाडी - मध्यंतरानंतर पृथ्वीराज पाटीलने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. हर्षद कोकाटेने भक्कम प्रतिवार करत तीन गुणांनी आघाडी घेतली. पृथ्वीराज पाटीलने पुन्हा पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मात्र, हर्षद कोकाटेने प्रत्येक आक्रमण ठोकून लावत पृथ्वीराजला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करत हर्षद कोकाटेने नऊ तीन अशा फरकाने ही चुरशीची लढत रंजकपणे जिंकली. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील पुण्याच्या हर्षद कोकाटेकडून पराभव झाल्याने महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती, संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक तसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. हिंद केसरी रोहित पटेल, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, बापूसाहेब लोखंडे, सईद चाऊस, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पोलीस उपाधीक्षक विजय चौधरी आदीची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.