ETV Bharat / state

Who was Father Stan Swami : कोण होते फादर स्टॅन स्वामी...काय आहे कोरेगाव भीमा प्रकरण - यूएपीए

मानवाधिकार कार्यकर्ते (Human rights activists) आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी (What is the Koregaon Bhima case ) अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं 1 वर्षापूर्वी आजच्या दिवशी 5 जुलैला निधन झालं. पाहुया कोण होते फादर स्टॅन स्वामी (Who was Father Stan Swami)

Father Stan Swami
फादर स्टॅन स्वामी
author img

By

Published : Jul 5, 2022, 1:15 PM IST

पुणे: मानवाधिकार कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं बरोबर 1 वर्षापूर्वी 5 जुलैला निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला होता. स्वामींवर ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोण होते फादर स्टॅन स्वामी...काय आहे कोरेगाव भीमा प्रकरण (What is the Koregaon Bhima case ) याबाबत जाणून घेऊया...

समाजशास्त्राचे अभ्यासक : स्टॅन स्वामींचा जन्म 26 एप्रिल 1937 रोजी तामिळनाडूच्या त्रिची येथे झाला. (Who was Father Stan Swami) त्यांचे वडील शेतकरी होते. आई गृहिणी होती. त्यांनी समाजशास्त्रात एमए केलं होतं. त्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं. नंतर झारखंडमध्ये आल्यावर त्यांनी आदिवासी आणि वंचितांसाठी काम सुरू केलं होतं.

आदिवासींच्या हक्कासाठी संघटना : सुरुवातीला स्वामी यांनी पाद्री म्हणून काम पाहिलं. झारखंडमध्ये आदिवासींनी त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष सुरू केला होता. त्यावेळी स्वामींनी झारखंडमध्ये विस्थापन विरोधी जनविकास आंदोलन या संघटनेची स्थापना करून मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. दलित आणि आदिवासींच्या हक्कासाठी ही संघटना कार्यरत आहे. रांचीच्या नामकुम क्षेत्रात आदिवासी मुलांसाठी ते शाळा आणि टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यू चालवत होते. पत्थलगढी आंदोलनात जमावाला भडकावल्याचा आणि सरकार विरोधी विधानं केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे झारखंडच्या पोलीस ठाण्यात स्वामींसह 20 जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भीमा कोरेगाव प्रकरण : पुण्यात 2018 मध्ये एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव परिसरात हिंसा उसळली होती. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली होती. नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली होती.राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फादर स्टेन यांना रांचीवरून ऑक्टोबर २०२० मध्ये अटक केली होती. त्यावेळेस त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. एनआयएनने स्टेन यांच्या विरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कारवाई केली होती.या प्रकरणात आत्ता पर्यंत अनेक राजकीय लोकांचे जवाब नोंदविण्यात आले आहे.

रुग्णालयाऐवजी तुरूंगातच मरेन : सुनावणी दरम्यान नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल होण्यासाठी हायकोर्टासमोर नकार दिला होता. 'रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन' अस फादर स्टॅन स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सांगितले होते. पार्किसन्स आजाराने त्रस्त असलेले स्टॅन स्वामी यांनी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होत. मला कोणत्याही रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, त्यापेक्षा मला जामीन द्या, मी रांचीला जाईन अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

घरावर पोलिसांनीही टाकला होता छापा - येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेसंदर्भात फादर स्टेन स्वामींच्या रांचीतील घरावर छापा टाकण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आले होते.फादर स्टेन स्वामींनी पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एनआयएला पुरावे परत मिळवण्यात यश आले आहे, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली होती. त्यानंतर एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी स्वामींचा जामीन एनआयए कोर्टाने २२ मार्च 2021 रोजी फेटाळला होता. एनआयएने फादर स्टेन स्वामी यांच्या जामिनाला विरोध केला होता.

आरोप काय होते ? - स्वामींवर एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप आहे. तसेच नक्षलवादी संघटनेशी संबंधित असल्याचाही आरोप होता. हा आरोप त्यांनी फेटाळला होता. स्वामींनी एक व्हिडीओ जारी करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. एनआयएने माझ्यासमोर अनेक आरोप ठेवले. नक्षलवाद्यांशी माझा संबंध असल्याचं दाखवणारी ही कागदपत्रं होती. मात्र, हे एक षडयंत्र आहे. कोणी तरी चोरून माझ्या कॉम्प्युटरमध्ये ही कागदपत्रं टाकली आहेत, असा दावा त्यांनी केला होता.

हेही वाचा : Nupur Sharma : नुपूर शर्माचा गळा कापणाऱ्याला स्वतःची सगळी संपत्ती देणार : हिस्ट्री शीटर सलमान चिश्तीची व्हिडिओद्वारे धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.