पुणे - जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सकाळपासून अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. आज सकाळपासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतमालावर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला मात्र शेतीशिवाय पर्याय नाही. असं म्हणत शेतकरी पुन्हा उभारी येऊन शेतात काबाडकष्ट करत असताना आता अवकाळी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उभारीला आलेला शेतमाल खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या सरींसह पांढरं धुकं; शेतकऱ्यांची वाढली चिंत्ता - पुण्यात पांढरं धुकं
सोमवार सकाळपासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतमालावर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.