पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्ग आणि उद्योगांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकांना 70 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर 12 टक्क्यांहून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देखील जीएसटी परिषदेला सादर करण्यात आला आहे.
त्यामुळे याचा उपयोग देशाच्या आर्थिक विकासासाठी होईल, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली आहे.