पुणे - अमेरिकेत अशा प्रकारचा हल्ला होणे ही निंदनीय बाब असून या घटनेचा धिक्कार केला पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तर, चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजपाची, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या युतीच समर्थन केले जाऊ शकत नाही, ते चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमेरिकेत झालेला हल्ला हा निंदनीय -
प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा असू शकते. सगळ्यांना एकाच व्यक्तीचा विचार पटेल, असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. त्यामुळे अमेरिकेत किंवा जगात अश्या प्रकारचे हल्ले होणे ही निंदनीय बाब आहे. या घटनेचा धिक्कार केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
परदेशात गेलेल्या प्रवाशांनी पळवाट काढली! -
परदेशात गेलेल्या प्रवाशांनी क्वारंटाइन राहायला पाहिजे. त्यांनी काळजी घ्यायला हवी. युकेमधून आल्यानंतर मुंबईत प्रवाशांना क्वारंटाइन करतो, पण काही प्रवाशी पळवाटा काढत आहेत. हे अस करणे सगळ्यांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळल्यासारखे आहे, असेही अजित पवार म्हणाले.
त्यांचे समर्थन होऊ शकत नाही -
चंद्रकांत पाटील यांच्या गावी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपाशी युती केली आहे. हे अत्यंत चुकीचे असून त्याच समर्थन कोणीच करणार नाही. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतो आणि त्या ठिकाणी असे घडण अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - भारताचा पहिला फॉर्म्युला 2 रेसर जेहान दारुवालाची एक्स्लुजीव मुलाखत