ETV Bharat / state

चित्रपटात झळकणाऱ्या जुन्नर तालुक्यातील गावांची पाण्यासाठी वणवण - water problem

अनेक हिंदी व मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

चित्रपटात झळकणाऱ्या जुन्नर तालुक्यातील गावांची पाण्यासाठी वणवण
author img

By

Published : May 18, 2019, 10:46 AM IST

Updated : May 18, 2019, 3:36 PM IST

पुणे - अनेक हिंदी व मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरील आदिवासी कोळी समाजाचे वास्तव्य असलेल्या मुथाळने, कोपरे आणि मांडवे या परिसरातील दुष्काळाचे भीषण संकट उभे राहिले आहे.

नगर-कल्याण महामार्गाच्या उत्तरेला उदापूर गावातून थोडे पुढे गेले की घाटमाथ्यावर मुथाळने गाव लागते. इथे पाण्याच्या शोधात महिलांची भटकंती सुरू असताना गावांमध्ये विहिरींच्या खोलीकरणाची कामे सुरू आहेत. जमिनीच्या भुगर्भातील काळापाषाण खडक तोडुन त्यात या नागरिकांचा पाण्याचा शोध सुरू झाला आहे. मात्र, पाणी नावालाच दिसतंय त्यामुळे दुष्काळी संकट आता या नागरिकांच्या पाटीलाच पुंजलय की काय असाही प्रश्न उभा राहिला आहे.

चित्रपटात झळकणाऱ्या जुन्नर तालुक्यातील गावांची पाण्यासाठी वणवण

मुथाळने गावात देखील अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शाळांना सुट्टी असल्याने खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकली मुलेही पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. तर, मांडवे गावात पावसाळ्यात खळखळून दुथडी वाहणाऱ्या मांडवी नदीतल्या एका गढुळ डोहावरून महिला पाणी भरून नेत आहेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे गावात विविध आजार पसरल्याचे माजी महिला सरपंचांनी सांगितले. त्यामुळे सिंचनासाठी लाखो रुपये खर्च केले असतानाही ही गावे तहानलेली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:Anc :अनेक हिंदी मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरली आदिवासी कोळी समाजाचं वास्तव्य असलेल्या मुथाळने,कोपरे, आणि मांडवे या परिसरातील दुष्काळाचं भीषण संकट उभं असताना महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु असताना चिमुकल्यांची पाण्यासाठी धडपड सुरु आहे चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट

vo__पाणी हा माणसाच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे याच पाण्याच्या शोधात आता नागरिकांची भटकंती सुरु झाली आहे तळपत्या उन्हात गावातील महिला डोक्यावर हंडाघेऊन पाण्यासाठी संघर्ष करत असताना देशाच्या सिमेवर लढणारे जवानही आज पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहे या सर्व वेदना मनाला चटका लावुन जाणा-याच आहे

Byte__माजी सैनिक

Byte__महिला नागरिक

Vo_नगर-कल्याण महामार्गाच्या उत्तरेला उदापूर गावातून थोडं पुढं गेलं कि घाटमाथ्यावर मुथाळने गाव लागतं इथं पाण्याच्या शोधात महिलांची भटकंती सुरु असताना गावांमध्ये विहिरींच्या खोलीकरणांचे कामे सुरु आहे जमिनीच्या भुगर्भातील काळापाषाण खडक तोडुन त्यात या नागरिकांचा पाण्याचा शोध सुरु झालाय...मात्र पाणी नावालाच दिसतय त्यामुळे दुष्काळी संकट आता या नागरिकांच्या पाटीलाच पुंजलय कि काय असाही प्रश्न उभा राहिला आहे

Byte__ स्थानिक नागरिक.

vo__ मुथाळने सोडलं आणि आम्ही थोडं पुढे सरकलो तर रस्त्याच्या बाजूला एका शिवकालीन टाक्या मधून भर दुपारी काही महिला,पुरुष भर उन्हात पाणी वाहतात त्यातच शाळांना सुट्टी असल्याने खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकली मुलेही पाण्यासाठी वणवण भटकंती करतात..
त्यांनीही आपल्या वेदना आम्हाला सांगितल्या

Byte__महिला नागरिक

Byte_ नागरिक

vo__थोडं पुढे सरकल्यावर मांडवे गावात पोहोचण्याआधी डाव्या बाजूस उंच डोंगराच्या तळाशी एक भली मोठी घळ दृष्टीस पडली... पावसाळ्यात खळखळून दुथडी वाहणारी हीच मांडवी नदी..! या नदीतल्या एका गढूळलेल्या डोहावर काही महिला पाणी भरून डोक्यावरुन वाहत होत्या.त्यातल्या एक होत्या गावच्या माजी सरपंच.लग्नाला २५ वर्ष झाले पण डोक्यावरचा हंडा मात्र उतरला नाहीच पण दूषित पाण्यामुळे गावात विविध आजार पसरल्याचे त्यांनी सांगितलं

Byte__महिला सरपंच..

vo__ उगवत्या सुर्याला साक्ष देत पोटाचं खळगं भरण्यासाठी नाही तर पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांची पाण्यासाठी वणवण पहायला मिळते हे आज नाही तर गेली वर्षानुवर्षं चालत आलेलं संकट असल्याचे नागरिक सांगतात मात्र सिंचनासाठी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र या योजनांमधुन प्रत्येक्षात काय मिळते हे हि परिस्थिती पहिल्यावर लगेच कळते.

vo end__ निसर्गाचे एक वेगळं वरदान लाभलेल्या या कोपरे- मांडवे परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरु असताना मायबाप सरकार प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी उघड्या डोळ्यांनी हि परिस्थिती पहावी अन ऐवढीच माफक आपेक्षा.Body:...Conclusion:
Last Updated : May 18, 2019, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.