आळंदी (पुणे) - आजपासून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिरही उघडण्यात आले आहे. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तब्बल सात महिने 15 दिवसांनंतर वारकरी आणि माऊलींची दर्शनातून भेट झाल्याने ताटातूट झालेल्या लेकराची आईशी भेट झाल्यासारखा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आई आणि लेकराच्या भेटीसारखी माऊलींची भेट; वारक-यांनी केली भावना व्यक्त - aalandi temple news
आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिरही उघडण्यात आले आहे. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तब्बल सात महिने 15 दिवसांनंतर वारकरी आणि माऊलींची दर्शनातून भेट झाल्याने ताटातूट झालेल्या लेकराची आईची भेट झाल्यासारखा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आळंदी संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी मंदिर
आळंदी (पुणे) - आजपासून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिरही उघडण्यात आले आहे. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तब्बल सात महिने 15 दिवसांनंतर वारकरी आणि माऊलींची दर्शनातून भेट झाल्याने ताटातूट झालेल्या लेकराची आईशी भेट झाल्यासारखा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर भाविकभक्त, वारक-यांसाठी खुले करण्यात आले आहे. पहाटे चार वाजताच महाद्वार उघडण्यात आले त्यानंतर नित्योपचार, अभिषेक काकड आरती करण्यात आली. 6 वाजल्यापासून वारकरी भक्तांना माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला आहे. यावेळी माऊलींना भरभरुन पाहण्याचा योग आला, हा आनंदाचा दिवस असून यापेक्षा दुसरे सुख नसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
शासकीय नियमांचे काटेकोर पालन
आजपासून राज्यातील मंदिर दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र यात दर्शनबारी, मंदिर स्वच्छता, मास्क, सॅनिटाइजर वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिर व परिसरात शासनाने घालुन दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असुन भाविकांना कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी केले आहे.