पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरात सोसायटीची सीमाभिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीच्या मलब्याच्या खाली काही मुले अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, अजूनही याबद्दल कुठलीही पुष्टी मिळाली नाही. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी येथे ही घटना घडली आहे. इथल्या यशवंत प्राईड सोसायटीच्या ड्रेनेजचे काम सुरू होते. हे काम करत असताना या सोसायटीची सीमाभिंत कोसळली. त्याच्या मलब्याखाली भिंतीजवळ खेळत असलेली मुले अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान घटना घडल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रेस्क्यूचे काम सुरू करण्यात आले. दोन पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. पोकनेलच्या सहाय्याने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.