ETV Bharat / state

दहा महिन्यांनंतर सराईत गुन्हेगार अटकेत, वाकड पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Jun 4, 2020, 10:22 PM IST

पोलीस कर्मचारी कण्हेरकर यांना माहिती मिळाली की, मोईज हा लातूर जिल्ह्याच्या निलंग्यातील हंगरगा येथे आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अधिकारी बाबर यांच्या एका पथकाने तात्काळ लातूर येथे धाव घेतली.

absconding criminal arrested
सराईत गुन्हेगार अटकेत

पुणे - मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. मोईज रब्बानी शेख असे आरोपीचे नाव असून त्याला लातूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मोईज हा गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस कर्मचारी कण्हेरकर यांना माहिती मिळाली की, मोईज हा लातूर जिल्ह्याच्या निलंग्यातील हंगरगा येथे आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अधिकारी बाबर यांच्या एका पथकाने तात्काळ लातूर येथे धाव घेतली. यानंतर औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे बापू काळे यांच्या सहकार्याने हंगरगा येथून शिताफीने आरोपीला अटक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.