ETV Bharat / state

पुण्यात वोडाफोन नेटवर्क ठप्प, ग्राहक वैतागले - पुणे वोडाफोन नेटवर्क जाम

ग्राहकांनी बुधवारपासून कंपनीकडे यासंबंधी तक्रारीही केल्या आहेत. परंतु, त्यांना नेटवर्क नसण्याचे ठोस कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. तांत्रिक अडचण आहे, लवकरच नेटवर्क सुरू होईल, असेच कारण ग्राहकांना सांगितले जात आहे.

पुण्यात वोडाफोन नेटवर्क ठप्प
पुण्यात वोडाफोन नेटवर्क ठप्प
author img

By

Published : Oct 15, 2020, 7:05 PM IST

Updated : Oct 15, 2020, 7:57 PM IST

पुणे - शहरात वोडाफोनला नेटवर्क येत नसल्यामुळे सकाळपासून ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ग्राहकांनी बुधवारपासून कंपनीकडे यासंबंधी तक्रारीही केल्या आहेत. परंतु, त्यांना नेटवर्क नसण्याचे ठोस कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. तांत्रिक अडचण आहे, लवकरच नेटवर्क सुरू होईल, असेच कारण ग्राहकांना सांगितले जात आहे. त्यामुळे वोडाफोनच्या ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पुण्यात वोडाफोन नेटवर्क ठप्प, ग्राहक वैतागले

अनेक ग्राहकांनी पुण्यातील 'वोडाफोन गॅलरी'च्या बाहेर धाव घेत तक्रारीचा पाढा वाचला. ग्राहकांना सांगण्यासाठी ठोस उत्तर नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मात्र पाचावर धारण बसली आहे.

हेही वाचा - मावळमध्ये मुसळधार पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान; हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सेवा ठप्प झाल्याचे वोडाफोनच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात-लवकर सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे वोडाफोनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Last Updated : Oct 15, 2020, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.