ETV Bharat / state

भारताचा इतिहास पाहून वारिस पठाणांनी तोंड बंद ठेवावं - विश्व हिंदू परिषद - विश्वहिंदू परिषद

कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका जाहीर सभेत बोलताना वारिस पठाण यांनी काही चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. त्याला विश्व हिंदू परिषदेच्या मिलिंद परांडे यांनी उत्तर दिले आहे. वारिस पठाणांनी भारताचा इतिहास पाहून आपले तोंड बंद ठेवावे, असे परांडे म्हणाले.

Milind Parande
मिलिंद परांडे
author img

By

Published : Feb 21, 2020, 4:12 PM IST

पुणे - वारिस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकीवजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि आपले तोंड बंद ठेवावे. हिंदूना धमकावून काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेच्या मिलिंद परांडे यांनी दिली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

भारताचा इतिहास पाहून वारिस पठाणांनी तोंड बंद ठेवावं

कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका जाहीर सभेत बोलताना वारिस पठाण यांनी काही चिथावणीखोर वक्तव्ये केली. 'आम्ही 15 कोटी आहोत मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए हैं, स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर ते हिसकावून घ्यावं लागतं' असे पठाण म्हणाले.

हेही वाचा - चिथावणीखोर भाषण करणाऱ्या वारिस पठाणांवर कारवाई करा; भाजपची मागणी

याला उत्तर देताना मिलिंद परांडे यांनी वारिस पठाण यांना धारेवर धरले. वारिस पठाणांनी इतिहासात जावे आणि पहावे हिंदू समाजावर जी संकटं आली त्यांचा आम्ही न घाबरता सामना केला आहे. हिंदू समाजाची चिंता करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.