पिंपरी चिंचवड : माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे की,. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या बाबतचा तक्रार अर्ज सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत आहे. सदरचे पत्र हे पूर्णतः खोटे आहे. या अनुषंगाने डॉ. डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिल्याने सदर पत्र हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे.
अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वीही वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम, आपुलकी व आशीर्वाद मिळाल्यामुळे अशा विघ्नसंतोषी लोकांच्या आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर दिला आहे, तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की “ मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाई मुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही.
हेही वाचा : 'IPS कृष्ण प्रकाश यांनी 200 कोटींची वसुली केली?' पोलीस अधिकाऱ्याचे पत्र व्हायरल