पुणे - एकदाचे यांना पाडा म्हणजे कायमची कीड संपेल, अशा शब्दात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली. ते रविवारी बारामतीत भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
शिवतारे म्हणाले, की बारामतीमधील काही लोकं गेली अनेक वर्ष भावी पंतप्रधान म्हणून वावरत होते. मात्र, गुजरातचा एक सामान्य चहावाला पंतप्रधान झाला. हे त्यांना बघवत नाही. त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे आपण सजगतेने काम करायला हवे, असे ही शिवतारे यावेळी म्हणाले.