पुणे - मागील 8 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका भाजीपाल्यावर झाला असून राजगुरुनगर बाजारसमितीत मेथी, कोथिंबिरीची आवक घटली आहे. मात्र, आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने मेथी व कोथिंबीरच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र, बाजारात मेथी व कोथिंबीरला चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, शहरी भागात भाजीपाल्याच्या वाढत्या बाजारभावामुळे शहरी नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सध्या मेथी कोथिंबीरने बाजारात भाव खाल्ला असला तरी उत्पादन खर्च, मजुरी व पावसामुळे होणारे नुकसान मोठे आहे. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावातही नुकसानच सहन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजारभाव (प्रति शेकडा)
मेथी - १ हजार ७००
कोथिंबीर - १ हजार ४००