ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडी व्यापाऱ्यांच्या पाठीशी - प्रकाश आंबेडकर - वंचित बहुजन आघाडी बातमी

सरकारच्या निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांनी दूकाने उघडली तर वंचित बहूजन आघाडी व्यापाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील, असे अ‌‌ॅड. प्रकाश आंबेडकर

अ‌ॅड प्रकाश आंबेडकर
अ‌ॅड प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 7, 2021, 7:54 PM IST

पुणे - राज्यात सरकारने टाळेबंदीची जी नियमावली जाहीर केली आहे, त्याला वंचित बहूजन आघाडीचा विरोध आहे. या निर्णयामुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य जनता आता सरकारच्या या निर्णयाचा विरोध करेल. त्याआधी सरकारने स्वतःहून विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा. सरकारच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी दूकाने उघडली तर वंचित बहूजन आघाडी व्यापाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील. पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही त्यांच्या समोर उभे राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतो

आंबेडकर म्हणाले, कोरोना खरच आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळमध्ये मोठ्या प्रचारसभा होतात. निवडणुका होतात आणि कोरोना महाराष्ट्रात कसा वाढतो, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महाविकास आघाडीचे सरकार टिकणार का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, सत्ता कोणाला नको आहे. मात्र, राजकारणातले गुन्हेगार आणि प्रशासनातले गुन्हेगार एकत्र येऊन 100 कोटी वसूलीचा निर्णय झाला आणि त्यातूनच हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. याप्रकरणाचा योग्य तो तपास करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे पुण्यातील परप्रांतिय मजूर निघाले गावाला, म्हणाले- पुन्हा तो त्रास नको

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.