पुणे - भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांनी २२ एप्रिल रोजी तात्पुरता जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. वरवरा राव यांच्या भावाच्या पत्नीचे निधन झाले आहे. निधनानंतरचे धार्मीक विधी २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान होणार आहे. हे विधी करता यावेत यासाठी वरवरा राव यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. हे धार्मिक विधी हैदराबाद येथे होणार आहेत.
राव हे सध्या पुण्यातील येरवडा जेलमध्ये आहेत. त्यांच्या भावाच्या पत्नीचे सोमवारी निधन झाले. राव यांच्या मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाल्याने घरात वरवरा राव हे मोठे आहेत. निधनानंतर धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे राव यांनी अर्जात सांगितले आहे.
तात्पुरता जामीन न मिळाल्यास पोलीस बंदोबस्तात (एस्कॉट) धार्मिक विधीसाठी परवानगी द्यावी, अशीही विनंती राव यांनी केली आहे. या अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे.