ETV Bharat / state

Indian Students in Ukrain : मुलांना लवकरात लवकर भारतात आणा; पालकांनी घेतली परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण यांची भेट

आज केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. ( V Muralidharan on Pune Visit ) याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांची आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्यात पुण्यातील जे डब्ल्यू हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे.

Union Minister V Muralidharan Meeting Pune with Parents whose childrens stuck in Ukrain
केंद्रीय परराष्ट्रमंत्री राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन आणि पालकांमध्ये बैठक सुरू
author img

By

Published : Mar 2, 2022, 12:52 PM IST

Updated : Mar 2, 2022, 3:24 PM IST

पुणे - रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबायचं नाव घेत नाही आहे. (Russia Ukrain War ) युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार विद्यार्थी हे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. ( V Muralidharan on Pune Visit ) याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांची आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्यात पुण्यातील जे डब्ल्यू हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने पालकांसोबत साधलेला संवाद

ऑपरेशन गंगावर आक्षेप घेण्याची गरज नाही, यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. सुमारे 20 हजार विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले होते त्यामधील 4 हजार विद्यार्थी हे 24 तारखेच्या आधी आलेत. कालपर्यंत 2 हजारपेक्षा अधिक लोक भारतात परतले आहेत. बाकी लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलंड, हंगेरी आणि शेजारील देशांच्या मदतीने लोकांना भारतात परत आणलं जातंय, असं यावेळी व्ही मुरलीधरन यांनी सांगितले आहे.

पालकांची परराष्ट्र राज्यमंत्र्यांशी चर्चा -

आमच्या मुलांशी आमचं सातत्याने बोलणं होत आहे.आज परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण पुण्यात असताना आमची बैठक झाली.या बैठकीत आमच्या मुलांना लवकरात लवकर परत आणू अस आश्वासन मंत्री यांनी दिला आहे.तसेच बॉर्डर क्रॉस करताना मुलांना काहीही अडचण होऊ नये, असंदेखील आम्ही मंत्री महोदय यांना सांगितलं आहे. जे काही मारहाणीच सांगितलं जातं आहे. ते खरं आहे, असंदेखील यावेळी पालकांनी सांगितलं आहे. तसेच अनेक किस्से जे मुलांनी सांगितले आहे, तेदेखील यावेळी पालकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी नवी रणनीती, युक्रेनच्या सीमेजवळील देशांमध्ये भारताचे विशेष दूत

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Ukraine-Russia conflict ) पुकारलं आहे. रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे सैन्य निकाराने लढा देत आहेत. रशियाने सुरु केल्या या युद्धाचे पडसाद सुंपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी ( Indian Students In Ukraine ) आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या चार मंत्र्यांना युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये गेले आहेत.

हेही वाचा - Russia Ukraine War : युक्रेनला पाठिंबा, पण, रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिका स्वतःचं सैन्य पाठवणार नाही - बायडेन

ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहोचले आहेत. तर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून स्लोव्हाकियात पोहचले आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी बुडापेस्ट, हंगेरी येथे पोहोचले. तर जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे पोलंडला पोहचले आहेत. हे चारही नेते भारताचे विशेष दुत म्हणून युक्रेनमधून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारमध्ये समन्वय साधण्याचे काम करत आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया रोमानियामध्ये कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव यांची भेट घेऊन बचाव कार्यावर चर्चा केली. येत्या काही दिवसांत, बुखारेस्ट आणि सुसेवा येथून चालवल्या जाणार्‍या निर्वासन आणि उड्डाणे याबद्दल सविस्तर चर्चाही केली. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. रोमानिया आणि मोल्दोव्हा येथील भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि येत्या काही दिवसांत बुखारेस्ट आणि सुसेवा येथून निर्वासन आणि उड्डाण नियोजनासाठी ऑपरेशनल मुद्द्यांवर चर्चा केली, असे त्यांनी म्हटलं.

Last Updated : Mar 2, 2022, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.