पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गिरीश बापट यांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. गिरीश बापट ज्यावेळेस दवाखान्यात दाखल झाले, त्याचवेळेस दीनानाथ मंगेशकर दवाखान्यांमध्ये राणेंना नातू झाला होता. ते रात्रभर हॉस्पिटलमध्ये होते. सकाळी त्यांना कळाले की, बापट यांना ऍडमिट करण्यात आले, अशी आठवण सुद्धा नारायण राणे यांनी यावेळी सांगितले आहे.
पित्रतुल्य व्यक्तिमत्व हरवले : मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात गिरीश भाऊ यांची खूप मदत मला झाली. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. नेहमी सर्वांशी आपुलकीने बोलणे, विचारणे हा त्यांचा मनमोकळा स्वभाव होता. त्यामुळे गिरीश आणि पुणे हे एक समीकरण होते. पित्रतुल्य व्यक्तिमत्व हरवल्याने आता कुणाकडे बघायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना त्यातून सावरण्याची शक्ती देवो. गिरीश बापट यांना शांती लाभो, अशी भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.
पोकळी निर्माण झाली : बापट १९९५ साली आमदार म्हणून सभागृहात आले तेव्हा मी स्वतः आमदार होतो. मी शिवसेनेत होतो. भाजपची व आमची युती होती. विधिमंडळाच्या कामात ते रस घ्यायचे. गिरीश भाऊ गेल्यामुळे आता पोकळी निर्माण झाली आहे. ते गेल्यामुळे भाजपचे नुकसान झाले. यातून पक्ष बाहेर येईल. पण त्यांच्या कुटुंबीयांना यातून बाहेर येण्यासाठी देव ताकद देवो, शोक भावना व्यक्त करताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नसलेले प्रेम दाखवायचे आहे : छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटात झालेल्या जाळपोळीबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, या प्रकरणात मी काही बोलणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे ते सांभाळतील. गरज पडली तर मी पुन्हा सल्ला देईन, असे सुद्धा ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी सावरकर यात्रा भाजपा व उद्धव ठाकरे गटांने काढली आहे. त्यामुळे या दोघांनी एकाच दिवशी काढल्यानंतर संघर्ष होऊ शकतो, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असे ऐकणाऱ्यांना सांगेल न ऐकणाऱ्या लोकांना सांगू शकत नाही. सावरकर यांच्याबद्दल नसलेले प्रेम दाखवायचे आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ऐकणारे आमच्या पक्षातील आहेत. मी जो अभिप्रेत असेल, असा योग्य संदेश देईल.
उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सत्ता बदलासाठी दीडशे बैठका घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर माझे आणि सावंतांचे काहीही बोलणे झाले नाही, असेही नारायण राणे म्हणाले. सावंत मुंबईत, मी दिल्लीत. सावंत असे काही असे भाष्य माझ्याकडे काढत नाही, असे ते म्हणाले. ठाकरे गट आता संपलेला आहे. ठाकरेंची शिवसेनासुद्धा संपलेली आहे. काय राहिलेत ठाकरे? संपले आता, ठाकरे यांचे काय राहिले आहे, मातोश्री राहिले आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकासुद्धा केली आहे.
अन्यायाच्या विरोधात लढणारे : बुधवारी खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी बापट यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी गिरीश बापट हे फक्त लढवय्या नव्हे, तर बापट अन्यायाच्या विरोधात लढणारे नेते होते, असे त्यांनी विधान केले होते. छत्रपती संभाजीनगरमधील तणावाच्या वातावरणावरून त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.