पुणे: 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम डिपी रोडवर पंडित फार्मवर होणार आहे. अशी माहिती यावेळी मुळीक यांनी दिली.
असा असेल दौरा : या दौऱ्यादरम्यान १९ फेब्रुवारीला शाह शिवनेरी किल्ल्यावर भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा हे १८ फेब्रुवारीला दुपारी पुण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शाह यांचा पुण्यात मुक्काम आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर शाह शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर शाह कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर शाह यांची सासुरवाडी असून दोन दिवसात विविध सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.
मंत्री शाह यांचा कार्यक्रम कोथरूड मतदार संघात : कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे पुण्यात येत आहे. यावर मुळीक म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे उतरणार नाही. कार्यक्रम हा कोथरूड मतदार संघात होणार आहे. विरोधकांची त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि त्यांना त्यांच्या पराभव कशी लागला आहे म्हणून अशा पद्धतीची टीका केली जात आहे, असे देखील यावेळी मुळीक म्हणाले.
ओबीसींना घटनात्मक अधिकार देण्याचे काम: 2021 मध्ये नक्षली घटना 509 वर आल्या आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण देश नक्षलवादमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जंगली आणि दुर्गम भागात आम्ही रस्ते आणि मोबाईल टॉवर दिले आहेत. बंदूका हाती घेणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाजप सरकार करत आहे. छत्तीसगड हे ओबीसींनी भरलेले राज्य आहे. काँग्रेस सरकारने मागासवर्गीयांना काहीही दिले नाही. आम्ही ओबीसी आयोग स्थापन केला. मागासवर्गीयांना घटनात्मक अधिकार देण्याचे काम आमच्या नरेंद्र मोदी सरकारने केले आहे, असा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी 7 जानेवारी, 2023 रोजी छत्तीसगडमधील कोरबा येथे आयोजित सभेत केला होता.
2024 पूर्वी देश नक्षलवादमुक्त करणार: कोरबा दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादावर हल्ला चढवला होता. आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आम्ही नक्षलवादग्रस्त भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याच्या मार्गावर पोहोचलो आहोत. काँग्रेस राजवटीत 2009 मध्ये देशभरात 2258 नक्षलवादी घटना घडल्या होत्या. 2021 मध्ये या नक्षलवादी घटना 509 वर आल्या आहेत. 2024 च्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशाला नक्षलवादाच्या तावडीतून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे विधानही गृहमंत्री अमित शाह यांनी केले.