पुणे - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांची वैयक्तिक पातळीवर टीका सुरू झाली आहे. असे असताना शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीत पाठबळ देत टीकाकारांना लक्ष्य केले. "गोरे काले हुअे तो दिलवाले है",कारण टीका करणाऱ्यांना मन, ह्रदयच नसल्याची टीका त्यांनी केली. गोरे यांना मिशा नाही, मात्र तुमच्या खेड तालुक्याच्या विकासाची दिशा आहे, अशा शब्दात गोरेंची पाठराखण केली, ठाकरे राजगुरुनगर येथे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
- प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे मागील काही दिवसांपासुन सरकारमध्ये असतानाही शेतकऱ्यांचे, भुसंपादनाचे, विमा कंपनी बाबत असे अनेक वेगवेगळे जनहिताचे मुद्दे शिवसेने हातात घेतले. कारण आम्हाला सामान्य लोकांची जाण आहे. तसेच आम्ही कालही सत्तेत होतो, उद्याही असणार आहोत. मात्र, काही गोष्टी पटल्या नाही तर आम्ही सरकारविरोधात आवाज उठवणारच असेही ठाकरे म्हणाले. जनतेचा हाच तुमचा आवाज सत्तेत येण्यासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मतदारांना केले.राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना उमेदवार सुरेश गोरेंना वैयक्तिक पातळी टीकेतून टार्गेट केलं जात असताना शिवसेने प्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले, आमचे गोरे हे काळे हे गोरे हे पहाण्यापेक्षा तुमचं मनं व कामे किती काळी आहेत, हे पहा मग बोला. आजपर्यंत कॉगेस व राष्ट्रवादीकडून जी काय काळी कृत्य केली आहेत, ती आता उजेडात यायला लागली आहेत. ती पहिली पाहा माणसं कशी आहेत याच्यावर जाऊ नका, त्यांची कामे पहा असं म्हणत ठाकरेंनी टिकाकारांचा समाचार घेत शरद पवारांनाही लक्ष्य केले.
ईडीच्या कारवाईच्या वेळी पवारांनी साहनभुतीचा एक डोंगर उभा करुन ईडीशी लढले असं दाखवले. मात्र न बोलावता येताच कशाला "येडा की खुळा" न बोलावता येऊ नका. जेव्हा बोलवले जाईल, तेव्हा या! आता शौर्य दाखवु नका, असं म्हणत ठाकरेंनी ईडी प्रकरणावरून पवारांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी अजित पवारांचाही खरपूस समाचार घेतला.