बारामती - कासवाची तस्करी करून ती विक्रीसाठी जवळ बाळगणार्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू सजन गायकवाड (वय 22, रा. आमराई, बारामती), विजय अरुण गायकवाड (वय 21 रा. आमराई, बारामती) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
कासव तस्करी प्रकरणी बारामतीत दोन संशयित ताब्यात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (ता. 22) रोजी पहाटे तीनच्या सुमारास बारामती तालुक्यातील वंजरवाडी येथे दोन अनोळखी व्यक्ती रिक्षामधून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती ग्रामसंरक्षण यंत्रणेकडून प्राप्त झाली होती.ही माहिती प्राप्त होताच तालुका पोलिसांनी या ठिकाणी जाऊन संशयित दोघांना ताब्यात घेतले व अधिक कसून चौकशी केली असता त्यांच्याकडील ऑटो रिक्षा क्रमांक (एम. एच. बी. २०५४)मध्ये एक कासव सापडले. या कासवाबाबत चौकशी केली असता, ते विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. कासवापासून पैशांचा पाऊस पडतो, या अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते. हेही वाचा - जयपूर : आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी 4 जणांना अटक, 4.19 कोटींची रोकड जप्त
दोन्ही संशयित आरोपी व त्यांच्या ताब्यातील कासव व ऑटोरिक्षा पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासव तस्करी प्रकरणी बारामतीत दोन संशयित ताब्यात हेही वाचा - सामूहिक बलात्कार प्रकरणात चौघांना जन्मठेप; पाच वर्षांपूर्वी घडली होती घटना