ETV Bharat / state

Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली? - संशयास्पद कागदपत्रे

सुफा आतंकवादी संघटनेतील दोघांना पुण्यातील कोथरुडमधून मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडे संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते राजस्थान प्रकरणातील वॉन्टेड असून त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षिस देखील आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन यांनी या दोन तरूणांना पकडलेले आहे.

Terrorist Arrested
आतंकवादी संघटनेतील दोघांना पुण्यात अटक
author img

By

Published : Jul 19, 2023, 10:12 AM IST

Updated : Jul 19, 2023, 1:02 PM IST

पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

पुणे : पुणे पोलिसांनी राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेलता सुफा या आतंकवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना पकडले आहे. राजस्थान पोलिसांनी 30 मार्च 2022 रोजी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी यास पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. एनआएने या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून युनूस साकी, इम्रान आणि फिरोज पठाण हे तिघे फरार होते. ही संघटना दहशतवादी संघटनेपासून प्रेरणा घेऊन काम करत आहे.

संशयास्पद कागदपत्रे आढळली : या प्रकरणी पोलिसांनी इम्रान खान आणि युनूस साकी याला अटक केली आहे, तर फिरोज पठाण हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोथरुडमध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत आहे, अशी माहिती मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी 25 ते 30 वयोगटाच्या या दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे जिवंत काडतुसे मिळाली. मात्र, त्यांच्याकडे पिस्तुल मिळाले नाही. त्यांच्याकडील लॅपटॉपची पाहणी केली. त्यात काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे त्यांचा एखाद्या दहशतवादी कृत्यामागे हात असू शकतो, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे लगेच ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळविण्यात आली आहे. एटीएस आणि पुणे पोलीस अधिक चौकशी करीत असल्याचे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राजस्थान प्रकरणातील वॉन्टेड : याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना 3 जण मोटार सायकल चोरी करताना पोलिसांना आढळले. कोथरूड पोलीस स्टेशन बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यांना चौकशीसाठी घेऊन जात असताना एकजण पळून गेला. त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे जिवंत काडतुसे, तसेच वाहन चोरीचे साहित्य, 4 मोबाईल आणि लॅपटॉप आढळुन आले. अधिक चौकशी केली असता ते राजस्थान प्रकरणातील वॉन्टेड असल्याचे आणि त्यांच्यावर 5 लाख रुपये बक्षीस असल्याचे समजले. गेल्या 15 ते 16 महिन्यांपासून ते कोथरूड या ठिकाणी रहात होते. त्यांचा साथीदार फरार आहे.

हेही वाचा :

  1. Jammu and Kashmir Police : साकिब शकील दार या आतंकवाद्याला सोपोर कुपवाडा रोडवरून जेरबंद; जम्मू-काश्मिर पोलिसांची कारवाई
  2. Jammu & Kashmir: जम्मु काश्मिरमध्ये 300 दहशतवादी सक्रीय -लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी
  3. Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या

Last Updated : Jul 19, 2023, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.