पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू असताना एका कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश जमादार असे मृत कामगाराचे नाव असून बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव हे देखील या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. तर अन्य दोन तरुण सुखरूप असून दोन कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या चौकशीचे आदेश पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. मनुष्यवधाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात येईल, असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा - 'आरे' आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस कर्मचारी, लष्कर हे सर्व घटनास्थळी दाखल झाले होते. बचावकार्य सुरू होते. तब्बल नऊ तासांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास नागेशचा मृतदेह खड्ड्याच्या बाहेर काढण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत ऐकून दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत.
हेही वाचा - महाविकासआघाडीचा भाजपला शह; विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती लांबणीवर