बारामती (पुणे) - तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका १४ वर्षाच्या मुलाचा आणि ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
पुण्यात पोलीस अधिकारी असलेला मुलगा आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे १३ मे रोजी आले होते. ते पुन्हा पुण्यात गेल्यानंतर २७ मे रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चौघांना दोन दिवसांपूर्वी रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. यापैकी २ चाचण्या निगेटिव्ह तर २ पॉझिटिव्ह आल्या आहेत. यात १४ वर्षीय मुलाचा व 65 वर्षीय जेष्ठाचा समावेश आहे.
बारामती शहर कोरोना मुक्त झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात पुन्हा नव्याने हे दोन रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे.
बारामतीमध्ये दोघांना कोरोनाची बाधा; १४ वर्षाच्या मुलासह एका वृद्धाचा समावेश - Baramati corona latest news
पुण्यात पोलीस अधिकारी असलेला मुलगा आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे १३ मे रोजी आले होते. ते पुन्हा पुण्यात गेल्यानंतर २७ मे रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.