पुणे - जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास २ बिबटे विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. बिबट्यांना बाहेर काढण्यासाठी वनविभाग आणि माणिकडोह बिबटे निवारा केंद्रातली बचाव पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान या पथकासमोर आहे.
खेड, आंबेगावसह जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्या शिकारीच्या हेतुने पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याच शिकारीच्या मागे धावत असताना हे बिबटे विहिरीत पडले आहेत. शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेले हे बिबटे भटकळवाडी येथील जालिंदर लांडे यांच्या विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.