पुणे: या अपघातात रुग्णवाहिका चालक व त्याच्या शेजारील आणखी एकजण जखमी झाला आहे. त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भीमा कोरेगाव येथील वाडा पुनर्वसन फाट्यावरील छञपती ऑटो गॅरेज समोर येथे महेश राजाराम गव्हाणे हे त्यांची हिरो मोटार सायकल (एम एच १२ व्ही डी १३९३) अहमदनगर बाजूकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (एम एच १२ एस बाय १९९०) या गाडीवरील चालक शंकरसन श्रीनरहरी राऊत (रा.लोहगाव पुणे) याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महेश गव्हाणे याचा मोटारसायकललचा अपघात झाला. त्यामुळे महेश गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला.
मोटारसायकलला धडक : महेश गव्हाणे यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेची गाडी आली. त्यावेळी सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज काट्याजवळ रुग्णवाहिकेचा चालक वैभव गजानन डोईफोडे (रा.बजरंगवाडी, शिकापुर, ता.शिरूर) याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. श्रीकांत सुर्यकांत उबाळे (वय २६ वर्ष, रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भिमा) यांच्या मोटारसायकलला (एम एच १२ डी डब्ल्यु ६०७३ ) धडक बसल्याने अपघातामध्ये दुसरा व्यक्ती हा मयत झाला. रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे हे जखमी झाले आहेत. याबाबत महेश गव्हाणे यांच्या अपघाताबाबत संतोष काळुराम गव्हाणे यांनी तक्रार दिली आहे. श्रीकांत उबाळे यांच्या अपघाताबाबत प्रशांत सूर्यकांत उबाळे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
सातत्याने अपघात: पुण्यात 24 ऑक्टोबरला एका भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पुण्यातील नेहरू रस्त्यावरील सोनावणे हॉस्पिटलजवळ सकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली होती. या घटनेत दुचाकीला टँकरची धडक बसल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात लिलावती लाहोटिया असे मृत झालेल्या महिलेचे नाव होते. ही महिला ७५ वर्षांची होती. टँकर दुचाकीचा भीषण अपघात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भरधाव वाहनांचा वेग हे देखील अपघाताचे कारण आहे. दुचाकीला टँकरची धडक बसून हा अपघात झाला होता. या अपघातात या महिलेचा मेंदू बाहेर आला होता. लिलावती लाहोटिया या पुण्यातल्या सॅलिसबरी पार्क येथे राहत होत्या.
हेही वाचा: Nanded Crime News : बियाणींच्या हत्येप्रकरणी शार्प शूटर दीपक रांगाला एनआयएकडून अटक