पुणे - दौंड तालुक्यातील पाटस गावातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गावातील डॉक्टर असलेल्या पती-पत्नीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या इतरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पाटसमधील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने आणि पाटस ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सदर डॉक्टरांच्या रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला आहे. पाटस ग्रामपंचायतीकडून जंतूनाशक औषधाची फवारणी करत सॅनिटायझेशन केले गेले आहे.
पाटस परिसरातील डॉक्टर कोरोनाबाधित आढळून आले असले तरी परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. अशोक रासगे यांनी केले आहे. संबंधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना काही त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने शेजारील शासकीय रुग्णालयात याची कल्पना द्यावी, असे आवाहनही डॉ. रासगे यांनी केले आहे.
दौंडच्या पाटसमध्ये कोरोनाचा शिरकाव, दोन डॉक्टरांना लागण - पाटसमध्ये कोरोनाचा शिरकाव
पाटसमधील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने आणि पाटस ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सदर डॉक्टरांच्या रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला आहे. पाटस ग्रामपंचायतीकडून जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली असून सॅनिटायझेशन केले गेले आहे.