दौंड - तालुक्यात दोन दुचांकीच्या धडकेची घटना घडली आहे. एसआरपीएफच्या ग्रुप नंबर ५ च्या मोटार विभागाच्या समोर एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच दोन्ही दुचाकींचे अपघातात मोठे नुकसान झाले आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (एम एच १६ सिटी ५५१) भरधाव वेगात चालवून, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या मोटारसायकल नंबर (एम एच ४३ एपी ६३८८) समोरून धडक दिली.
दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
या अपघातात फिर्यादी वैभव दत्तात्रय देडे यांचा मित्र रणजित सुनील तपकिरे यास गंभीर दुखपत झाली आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे वैभव दत्तात्रय देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक दाभाडे हे करीत आहेत.
हेही वाचा - बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर ५० टक्के सवलत मिळणार