ETV Bharat / state

गुंड गजा मारणेची नागपूर तर निलेश घायवळची अमरावती कारागृहात रवानगी - गजा मारणे जंगी मिरवणूक

सुरक्षिततेच्या कारणावरून कुख्यात गुंड गजा मारणेची नागपूर तर निलेश घायवळची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गुंड गजा मारणे
author img

By

Published : Apr 6, 2021, 11:48 AM IST

पुणे : येरवडा कारागृहात स्थानबद्ध असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे आणि निलेश घायवळ या दोघांनाही सुरक्षिततेच्या कारणावरून नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. गजानन मारणेची नागपूर तर निलेश घायवळाची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

कारागृहातून सुटल्यानंतर काढली होती जंगी मिरवणूक

खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर गजा मारणे याने जंगी मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीनंतर पोलिसांवर टीका करण्यात आली. त्यानंतर त्याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. फरार झालेल्या गजा मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर एका वर्षांसाठी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.

निलेश घायवळची अमरावती कारागृहात रवानगी

कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अपहरण आणि खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एमपीडीए कायद्यांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध करण्यात आले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव या दोघांनाही नागपूर आणि अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा : 100 कोटी वसुली प्रकरण, सीबीआयचे पथक येणार मुंबईत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.