ETV Bharat / state

पुण्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना विविध ठिकाणाहून अटक, 28 लाखांचे मादक पदार्थ जप्त - मेफेड्रोन

पुण्यातील एनआयबीएम परिसरात एका तरूणीला आणि कोरेगाव पार्क येथून एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेऊन दोघांकडून एकूण 28 लाखांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 14, 2019, 11:27 PM IST

पुणे - एका तरुणीकडून 24 लाख किमतीचे 54 ग्राम मेफेड्रोन सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे. नयनतारा गुप्ता (वय 28) असे तरुणीचे नाव आहे.

पुण्यातील एनआयबीएम परिसरात ही तरुणी मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या महिलेला अटक केली. या महिलेवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यासोबत तिच्याकडून 416 एलएसडी स्टॅम्प देखील जप्त करण्यात आले आहे. पुणे विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात एलएसडी स्टॅम्प जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा - बाजार समित्या बरखास्त करणे हे शेतकऱ्यांना 'कॉर्पोरेट'च्या दारात उभे करण्याचा घाट

दुसऱ्या एका घटनेत डेव्हिड फ्रान्सिस या नायजेरियन नागरिकाडून पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेल जवळून 4 लाख 16 हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले. त्याच्यावरही गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

हेही वाचा - लिफ्ट मागताय.. सावधान! लिफ्ट देत एकाला अज्ञात स्थळी नेऊन लुटले

Intro:पुण्यात 28 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त, सीमाशुक विभागाची कारवाई

पुण्यात एका तरुणीकडून 54 ग्राम (24 लाख किमतीचे) मेफेड्रोन जप्त....नयनतारा गुप्ता (वय 28) असे तरुणीचे नाव..पुण्यातील एनआयबीएम परिसरात ही तरुणी मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती..त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या महिलेला अटक केली...या महिलेवर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता तिची रवानगी न्यायालयात करण्यात आली...यासोबत तिच्याकडून 416 एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले..पुणे विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात एलएसडी स्टॅम्प जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे।।।

दुसऱ्या एका घटनेत डेव्हिड फ्रान्सिस या नायजेरियन नागरिकाडून पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेल जवळून 4 लाख 16 हजाराचे कोकेन जप्त करण्यात आले...त्याच्यावरही गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली...
..Body:..Conclusion:....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.