ETV Bharat / state

Christmas 2022 : खास ख्रिसमससाठी तयार केले तब्बल 25 प्रकारचे केक - खास ख्रिसमससाठी

जगभरात ख्रिसमसचा सण ( Christmas around the world ) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे. याच पाश्र्वभूमीवर पुण्यातील 80 वर्ष जुनी असलेल्या मुर्तिज बेकरी ने पैठणी केक, साडी केक, आईस बकेट केक अशा तब्बल छोटे मोठे 25 प्रकारचे केक बनविण्यात आले ( 25 types of cakes were made ) आहे.

Christmas 2022
खास ख्रिसमससाठी तयार केले तब्बल 25 प्रकारचे केक
author img

By

Published : Dec 20, 2022, 12:14 PM IST

खास ख्रिसमससाठी तयार केले तब्बल 25 प्रकारचे केक

पुणे : डिसेंबर महिना म्हणजे नाताळ, सुट्टी, आणि सेलिब्रेशन असेच काहीसे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. दरवर्षी नाताळचा सण 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरात ख्रिसमसचा सण ( Christmas around the world ) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात. प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत केक खाऊ घालतात. या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे. याच पाश्र्वभूमीवर पुण्यातील 80 वर्ष जुनी असलेल्या मुर्तिज बेकरी ने पैठणी केक, साडी केक, आईस बकेट केक अशा तब्बल छोटे मोठे 25 प्रकारचे केक बनविण्यात आले ( 25 types of cakes were made ) आहे. विशेष म्हणजे मुर्तीज बेकरी ने ख्रिसमससाठी जे सांताक्लॉज क्रिसमस ट्री ( Santa Claus Christmas Tree ) तसेच विविध वस्तू हे चॉकलेट मध्ये बनवण्यात आले आहे.


25 प्रकारचे केक बनविण्यात आले : पुण्यातील मूर्तीज बेकरिमध्ये यंदाच्या ख्रिसमस साठी छोटे मोठे 25 प्रकारचे केक बनविण्यात आले आहे. यात पैठणी केक, साडी केक, आईस बकेट केक यांसह चॉकलेट मध्ये बनविण्यात आलेल्या चॉकलेट सांताक्लॉज, चॉकलेट क्रिसमस ट्री, चॉकलेट स्टार, चॉकलेट स्टॉकिंग, चॉकलेट बेल्ट, चॉकलेट रेनडिअर, चॉकलेट नो मॅन्स, चॉकलेट सांताक्लॉज च फेज, चॉकलेट चेरी आणि रम आणि छोटे मोठे केक यंदाच्या या ख्रिसमस साठी बनविण्यात आल्या आहे. यामध्ये रिच प्लम केक, रीच प्लम पुडींग या दोन केकला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

गिफ्ट देण्यासाठी उपयोगी असे गिफ्ट पॅक : गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पुण्यातील मूर्तीच बेकरीमध्ये सर्व धर्मीय सणउत्सवाच्या वेळेस त्या त्या सणांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या वस्तू आम्ही चॉकलेट मध्ये बनवत असतो यंदा देखील आम्ही ख्रिसमसच्या या पार्श्वभूमीवर विविध केक तसेच ख्रिसमस साठी लागणारे जे वस्तू असतात ते चॉकलेट मध्ये बनविण्यात येणार आहे. यात चॉकलेट सांताक्लॉज, चॉकलेट क्रिसमस ट्री, चॉकलेट स्टार, चॉकलेट स्टॉकिंग, चॉकलेट बेल्ट, चॉकलेट रेनडिअर, चॉकलेट नो मॅन्स, चॉकलेट सांताक्लॉज च फेज, चॉकलेट चेरी आणि रम, हे चॉकलेट मध्ये बनविण्यात आले आहे. तर यंदा विशेष म्हणजे आम्ही एक गिफ्ट पॅक बनविला आहे. ते यंदाच विशेष आहे. यात सर्व साहित्य हे चॉकलेटचे असतात. कोणालाही गिफ्ट देण्यासाठी हे गिफ्ट पॅक उपयोगी ठरणार आहे अस यावेळी मूर्तीज बेकरी चे मालक विक्रम मूर्तींज यांनी सांगितले.


केकला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी : ख्रिसमस साठी सध्या मोठ्या प्रमाणात केक कटिंग सुरू असतात. सुरुवातीला ख्रिसमसला केक कापण्याची प्रथा नव्हती. ख्रिसमसच्या दिवशी केक कापण्याची संकल्पना 16 व्या शतकात सुरु झाली. ख्रिसमसच्या दिवशी कधीही केक कापला गेला नव्हता. तेव्हा ब्रेड आणि भाज्या मिसळून एक डिश बनवली जायची ज्याला 'प्लम पुडिंग' असे म्हणायचे. 16व्या शतकात पुडिंग काढून त्यात गव्हाचे पीठ वापरले जात असे. त्यात अंडी, लोणी आणि उकडलेल्या फळांचा प्लम टाकला जात असे. काही लोकांनी हा पदार्थ ओव्हनमध्ये ठेवून तयार केला. त्याचप्रमाणे, हळूहळू या डिशने केकचे रूप धारण केले. आणि तेव्हापासून ख्रिसमला केक कापला जाऊ लागला आणि आत्ता मोठ्या प्रमाणात केकला बाजारात मागणी वाढली आहे.


नाताळच्या दिवशी या केकला सर्वाधिक मागणी : ख्रिसमसला बनवलेला केक महिनाभर आधीपासून बनवायला लागतो. कारण नाताळच्या दिवशी केकला सर्वाधिक मागणी असते. पण फ्रुट केकला सर्वाधिक मागणी राहते. या केकमध्ये ड्रायफ्रुट्सचे प्रमाण जास्त असते. लोक प्लम केक देखील खरेदी करतात. ख्रिसमच्या दिवशी वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. रिच प्लम केक, रीच प्लम पुडींग या दोन केक ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या वाढत असलेल्या महागाईचा फटका यंदाच्या ख्रिसमस मध्ये बनविण्यात आलेल्या केक ला देखील बसला आहे. 20 ते 30 टक्के भाव वाढ यंदा केक मध्ये करण्यात आली. पण तरीही ग्राहकांकडून केकला मागणी असल्याचे यावेळी मूर्तीज यांनी सांगितले.


ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.