ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमधील १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार - pimpri criminals banished

वाकड आणि देहूरोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. गुन्हेगारांची पार्श्वभूमी पडताळून तब्बल १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड
author img

By

Published : Oct 29, 2020, 10:52 PM IST

पुणे- कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची सुत्रे हातात घेतल्यानंतर गुन्हेगारीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. या दरम्यान, दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले परिमंडळ दोनमधील पोलीस ठाणे हद्दीतील १२ गुन्हेरांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

वाकड आणि देहूरोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. गुन्हेगारांची पार्श्वभूमी पडताळून तब्बल १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. हे गुन्हेगार हिंजवडी, वाकड, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी पुढील प्रमाणे-

सुधाकर शिवाजी लिमकर (रा. पुनावळे, पुणे), तुषार महादू बावकर (रा. मुळशी, पुणे)

वाकड पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी-

इरफान जमशेर खान (रा. थेरगाव, पुणे), स्वप्नील उर्फ भोन्या प्रकाश घाडगे (रा. म्हातोबा नगर, वाकड, पुणे), सुनिल विश्वनाथ ठाकूर (रा. रहाटणी, पुणे), दिपक बाळू धोत्रे (रा. निगडी, पुणे)

देहूरोड पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी-

समीर अकबर शेख (रा. थेरगांव, पुणे), शुभम उर्फ राजू राजेंद्र तरस (रा. किवळे, पुणे), अमीर बाडी समीर शेख (रा. गांधीनगर, देहूरोड, पुणे), सत्वील चित्रा स्वामी (रा. देहूरोड, पुणे), कोमल/ कमल बाबू हिरेमठकर (रा, देहूरोड, पुणे)

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी-

सदानंद अरुण चव्हाण (रा. परंदवडी, मावळ, पुणे)

हेही वाचा- पुण्यात औषध व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.