पुणे Tushar Gandhi complaint in Pune: संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडेंनी महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून बदनामी केली. या विरोधात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीसांनी संभाजी भिडेंविरुद्ध कारवाई केली नाही. यामुळे तुषार गांधींनी संभाजी भिडेंविरुद्ध पुण्यातील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
काय म्हणाले तुषार गांधी : भिडेंविरोधात आम्ही डेक्कन पोलीसांत तक्रार देऊनही पोलिसांकडून कुठलrही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही कायदेशीर बाबी तपासत असल्याचं पोलीसांनी मध्यंतरी आम्हाला सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही सर्वजण संविधान मानणारे लोकं असल्यानं, न्यायालय हा संविधानिक मार्ग असल्यानं आम्ही वकrल असीम सरोदेंमार्फत ही तक्रार दाखल करत आहोत, अशी माहिती तुषार गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंतचे लोक हे संभाजी भिडेंच्या पाया पडतात. त्यांना गुरुजी मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून कार्यवाहीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. ती आमची चूक आहे, असं मला वाटतं, यामुळं आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. पोलिसांवर प्रचंड दबाव असल्यामुळं पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळं पोलीस आणि संभाजी भिडेंविरोधात आम्ही न्यायालयात तक्रार दाखल केल्याचं तुषार गांधींनी म्हटलंय.
मोदी भिडेंवर कारवाई करणार का? : G20 परिषदेत महात्मा गांधींच्या समाधी स्थळावर देशभरातले नेते नेऊन एकीकडे नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींचे विचार जपत असल्याचा देखावा करत आहेत. मग संभाजी भिडे महात्मा गांधीबद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई करणार का? याचं उत्तर मोदींनी सांगणx गरजेच आहे. यामुळे याविरोधात जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली असल्यास असीम सरोदेंनी म्हटलंय.
हेही वाचा :
- Court on Sambhaji Bhide : संभाजी भिडे प्रकरणावरुन न्यायालयानं पोलिसांना फटकारलं; 'हे' आहे कारण
- Tushar Gandhi On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंवर कारवाई का नाही, उपमुख्यमंत्र्यांचे पाय कुणी बांधून ठेवलेत; तुषार गांधींचा सवाल, तक्रार दाखल
- Subodh Savji on Sambhaji Bhide: अन्यथा, मी संभाजी भिडेचा मर्डर करेन- माजी मंत्री आक्रमक, थेट गृहमंत्र्यांना पत्र