ETV Bharat / state

पुण्यात दारूने भरलेला ट्रक पलटी; नागरिकांनी लांबवल्या बाटल्या

पिंपळी (बारामती) येथील कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना वा-यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या.

truck overturned pune boxes liquor were snatched civilians
पुण्यात दारूने भरलेला ट्रक पलटी; नागरिकांनी लांबवल्या बाटल्या
author img

By

Published : Oct 29, 2021, 4:47 PM IST

Updated : Oct 29, 2021, 7:26 PM IST

बारामती (पुणे) - बारामती-पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रकमध्ये ६५ लाख रुपये किमतीचे ९५० बॉक्स भरले होते. अशी माहिती चालक निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली.

पुण्यात दारूने भरलेला ट्रक पलटी; नागरिकांनी लांबवल्या बाटल्या

पोलीस पाहून लोकांनी काढला पळ -

पिंपळी (बारामती) येथील कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगाव येथे निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना वा-यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. परंतु ड्रायव्हर व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नाही. सकाळ पर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर भर दिला असताना बारामती ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पळ काढला.

truck overturned pune boxes liquor were snatched civilians
पुण्यात दारूने भरलेला ट्रक पलटी; नागरिकांनी लांबवल्या बाटल्या

दारू घेऊन जाण्यात महिलांचाही सहभाग -

गाडी ड्रायव्हर निलेश गोसावी व क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये. यासाठी प्रयत्न केल्यावर ड्रायव्हर मारहाण करण्यात आली. तसेच नागरिकांनी गाडीची ताडपत्री सतुर या हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले. विशेष म्हणजे यात महिला ही सामील झाल्याची माहिती गाडी चालक यांनी दिली.

हेही वाचा - खूशखबर! ईपीएफवर वार्षिक व्याज 8.5 टक्के मिळणार; केंद्र सरकारकडून मंजुरी

Last Updated : Oct 29, 2021, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.