ETV Bharat / state

Truck Crossed Divider : ट्रकने डिव्हायडर तोडून उडवल्या तीन गाड्या; एक जखमी

author img

By

Published : Jan 11, 2022, 7:03 PM IST

Updated : Jan 11, 2022, 11:00 PM IST

Truck Crossed Divider
ट्रकने डिव्हायडर तोडून उडवल्या तीन गाड्या

18:57 January 11

घटनास्थळाची दृश्ये

पुणे - पुण्यातील धायरी परिसरामध्ये डिव्हायडर तोडून ट्रकने तीन गाड्या उडवल्या. ( Truck Crossed Divider ) या घटनेत एक जण जखमी झाला आहे. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

काय आहे घटना?

पुण्यातील धायरी परिसरातील ( Dhayari Area Pune ) गणेश नगर येथील मुक्ताई गार्डनजवळ ( Muktai Garden Ganesh Nagar ) आज (मंगळवार) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धायरी फाट्याकडून एक डंपर भरधाव वेगाने येऊन मुक्ताई गार्डन जवळील लोखंडी दुभाजक तोडला आणि हातगाड्या व टपऱ्यामध्ये शिरला. यात एक महिला जखमी झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हातगाड्या व टपऱ्यांचे नुकसान झाले आहे. ( Truck Crossed Divider Pune )

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत ११ हजार ६४७ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

कुठलीही जीवितहानी नाही -

डंपरचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं आहे. या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. बघ्यांची मोठी गर्दीदेखील झाली होती. घटनास्थळी सिंहगड पोलीस व सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनेची चौकशी करत आहे.

Last Updated : Jan 11, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.