ETV Bharat / state

पुण्यात आदिवासी हक्क संरक्षण समितीचे आंदोलन, धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्यास विरोध - धनगर समाज

धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाविरोधात शनिवारी पुण्यात आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने आंदोलन केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी फडणवीस सरकार धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देत आहे, असा आरोप यावेळी या समितीने सरकारवर केला.

आदिवासी हक्क संरक्षण समितीचे आंदोलन
author img

By

Published : Mar 10, 2019, 12:03 AM IST

पुणे - धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाविरोधात शनिवारी पुण्यात आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी हक्क संरक्षण समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

आदिवासी हक्क संरक्षण समितीचे आंदोलन

निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी फडणवीस सरकार धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देत आहे. येत्या १२ मार्चला फडणवीस सरकार उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. हे प्रतिज्ञापत्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल करू नये, असे आदिवासी हक्क संरक्षण समितीचे म्हणणे आहे. धनगर आणि गोवारी समाजाला आदिवासी आरक्षण देण्यात येऊ नये. तसेच बोगस आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र मिळविलेल्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्यावतीने करण्यात आली.

सरकारने आदिवासीवर अन्याय करणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केल्यास राज्यातील १ कोटी आदिवासी समाज सरकार विरोधात रस्त्यावर उतरले, असा इशारा आदिवासी हक्क संरक्षण समितीच्यावतीने देण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Intro:mh pune 01 09 adivasi andolan avb 7201348
Body:mh pune 01 09 adivasi andolan avb 7201348

Anchor
धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणा विरोधात शनिवारी पुण्यात आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी फडणवीस सरकार धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देत आहे. येत्या 12 मार्चला फडणवीस सरकार उच्च न्यायालयात एक एफिडेवीट दाखल करत आहे. आदिवासी समाजावर अन्याय करणारे एफिडेवीट सरकारने उच्च न्यायालयात दाखल करू नये असे आदिवासी हक्क संरक्षण समितीचे म्हणणे आहे. धनगर आणि गोवारी समाजाला आदिवासी आरक्षण देण्यात येऊ नये तसेच बोगस आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र मिळविलेल्या लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतिने करण्यात आली. सरकारने आदिवासीवर अन्याय करणारा एफिडेवीट उच्च न्यायालयात दाखल केल्यास राज्यातील एक कोटी आदिवासी समाज सरकार विरोधात रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

Byte डॉ संजय दाभाडे, पदाधिकारी आदिवासी हक्क संरक्षण समिती Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.