ETV Bharat / state

सोमेश्वर साखर कारखान्यातील वाहतूकदारांचा संप चर्चेअंती मागे - सोमेश्वर साखर कारखाना लेटेस्ट न्यूज

सोमेश्वर साखर कारखान्याच्या वाहतूक संघटनेने ऊस वाहतूक दरवाढ मिळावी यासाठी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र, वाहतूक संघटनांशी कारखाना प्रशासनाने चर्चा करून हा संप मिटवला आहे.

Transporters
वाहतूकदार
author img

By

Published : Jan 28, 2021, 12:39 PM IST

पुणे (बारामती) - आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमेश्वर साखर कारखान्याच्या ट्रक व ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने बुधवार (दि.२७) संप सुरू केला. संप सुरू झाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे व इतरांची चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्याने वाहतूक संघटनांनी हा संप मागे घेत कामकाज पूर्ववत केले आहे.

बुधवारी सकाळी दहा वाजता सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक किशोर भोसले, सचिन खलाटे, लक्ष्मण गोफणे तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे व इतर पदाधिकारी यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर हा संप मिटला. सकाळपासूनच वाहतूक संघटनेने ऊस वाहतूक दरवाढ मिळावी यासाठी संपाचे हत्यार उपसले होते. उसाची खाली झालेली वाहने कारखान्यातील कार्यस्थळावर लावण्यात आली होती. ऊसाची वाहतूक होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच कारखाना प्रशासनाची मध्यस्थी यशस्वी ठरल्याने संप मागे घेण्यात आला. संपामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.