ETV Bharat / state

भिमाशंकर रोडवर ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जण जखमी - Tractor accident Alhat

भिमाशंकर परिसरातील आल्हाट येथे दगडी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Tractor accident Alhat
ट्रॅक्टर अपघात आल्हाट
author img

By

Published : Dec 28, 2020, 10:48 PM IST

पुणे - भिमाशंकर परिसरातील आल्हाट येथे दगडी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा - हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दत्ता पुनाजी आढळ (वय 33) व विलास गंगाराम बुरुड (वय 29) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर संतोष सोमाजी किर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

..असा झाला अपघात

भिमाशंकर राजगुरुनगर या मार्गावरील आव्हाट येथे एका वळणावर ट्रॅक्टरच्या चालकाचा अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि काही क्षणातच ट्रॅक्टरसह ट्रॉली दरीत पलटी झाली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये चालकासह दोघेजण प्रवास करत होते. या भीषण अपघातात ट्रॅक्टरसह ट्रॉलीचा चक्काचूर झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्याचे राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिष गुरव यांनी सांगितले.

हेही वाचा - बारामती पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या, पाच दुचाक्या जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.