पुणे - पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबीयांची कार पानशेत धरणात कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या महिलेचा पती आणि मुलगा थोडक्यात बचावले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. समृद्धी योगेश देशपांडे (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नाव आहे. तर या महिलेचा पती योगेश देशपांडे (वय 35) आणि 9 वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावले आहेत. रविवारी पानशेत रस्त्यावरील कादवे गावाजवळ हा अपघात घडला.
काच लावली असल्याने महिलेचा मृत्यू-
दरम्यान स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारीच असलेल्या एका हॉटेलमधील दोरी घेऊन एका नागरिकाने पाण्यात उडी मारत गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि ती दोरी दुसऱ्या बाजूने झाडाला बांधून ठेवली. त्यामुळे कार आणखी खोल पाण्यात गेली नाही. त्यानंतर कारच्या मागच्या बाजूची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले आणि तातडीने पानशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.