ETV Bharat / state

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यटनास बंदी आहे. मात्र, पर्यटकांची गर्दी लोणावळ्यात होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

author img

By

Published : Oct 4, 2020, 3:42 PM IST

Updated : Oct 4, 2020, 5:28 PM IST

पर्यटक
पर्यटक

पुणे - लोणावळा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पण, काही पर्यटक विना परवाना लोणावळ्याच्या परिसरात पर्यटन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी आपसूकच पर्यटकांचे पाय लोणावळ्याकडे वळतात. हौसी पर्यटक नियमांचे उल्लंन करून रस्त्याच्या कडेला गर्दी करत सेल्फी काढत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी घालण्यात आलेल्या बंदीचे तीनतेरा होताना दिसत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोणावळा पर्यटनस्थळ हे अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहे. येथील भुशी धरण पर्यटकांना विशेष भुरळ घालते, ते सध्या तुडुंब भरले आहे. पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटकांची गर्दी लोणावळ्यात होत असते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी काही नियम अमलात आणले असून यात पर्यटनस्थळी पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, अनलॉकच्या माध्यमातून प्रशासनाने नागरिकांना काही प्रमाणात सूट दिल्यानंतर याचा गैरफायदा अनेक जण घेत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

लोणावळ्यात झालेली पर्यटकांची गर्दी

दरम्यान, शनिवार आणि रविवारी लोणावळा परिसरात पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर व भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटने फाटा येथील टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लोणावळा पर्यटनस्थळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

हेही वाचा - वाफ घेतल्याने कोरोना होत नसल्याची अफवा; उकळते पाणी सांडल्याने दोन चिमुरडे भाजले

Last Updated : Oct 4, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.