पुणे: बोपदेव घाटात रविवार निमित्त फिरायला जात असाल तर सावधान,ही घटना तुमच्या सोबत ही घडू शकते. एक जोडपं रविवारी बोपदेव घाट फिरून आल्यानंतर विश्रांतीसाठी वनविभागाच्या मदत केंद्रावर थांबले असताना, दोन अज्ञात इसमांनी येऊन शिविगाळ करत मारहाण केली आहे. लुटारूंनी जोडप्याच्या गळ्यातील 30 हजार किमतीची चेन जबरदस्ती काढून घेतली आहे. यानंतर लुटारूंनी घटनास्थळावरून पळ काढला.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: याबाबत जुबेर अलाउद्यीन खान (वय 24 रा. अलिफ टॉवर च्या जवळ कोंढवा ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे बोपदेव घाटात लुटणारी टोळी सक्रिय झाली का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या 8 दिवसांपूर्वी महाविद्यालयीन तरुण-तरुणीला लुटणारी एक तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना अटक केली होती. मात्र आता या रविवारी पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
लुटारूंचा धुमाकूळ: पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी 12 फेब्रुवारी रोजी जुबेर आणि त्यांची मैत्रीण सुट्टी निमित्त बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी 1.30च्या दरम्यान विश्रांतीसाठी वनविभागाच्या मदत केंद्र बूथ जवळ बसले असताना, पांढऱ्या रंगाच्या मोपेडवर दोन अज्ञात इसम आले. त्यांनी इथे काय काम आहे तुमचं ? असा सवाल करत शिविगाळ केली. जुबेर याचा जाब विचारला असताना दोघांनी मारहाण केली आहे. नंतर गळ्यात असलेली एक तोळा 30 हजार किमतीची सोन्याची चेन हिसकावून तिथून पसार झाले. या प्रकरणी कोंढवा पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
प्रवाश्यांसोबत लुटमार: लोकलमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना मुंबई बोरिवलीच्या जीआरपीने माहीम येथून 27 मे, 2022 रोजी अटक केली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी धारावी येथील रहिवासी होते. यापूर्वीही महिमा धारावी येथे आरोपींवर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आरोपी पसार: रात्री उशिरा मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना मुंबई बोरिवलीच्या जीआरपीने माहीम येथून अटक केली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी धारावी येथील रहिवासी आहेत. यापूर्वीही महिमा धारावी येथे आरोपींवर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आला होता. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून मारहाण करून लुटून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते.