लोणावळा (पुणे) - येथील भुशी धरण परिसरात मुंबईतील पर्यटकाला एकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पर्यटकाने लोणावळा शहर पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेदांता चंदानी (वय- 24 वर्षे, रा. मुंबई), असे मारहाण झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तक्रारदार हा त्याच्या मैत्रिणीसह भुशी धरण परिसरात चारचाकी मोटारीतून फिरत होता. तेव्हा त्यांना अडवून मारहाण झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 19 डिसें.) घडली आहे, अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.
रस्ता चुकल्याने भुशी धरण परिसरात आले अन...
तक्रारदार वेदांता हा त्याच्या मैत्रिणीसह लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. तेव्हा, पौड रोडने अँबी व्हॅलीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. मात्र, ते रस्ता चुकल्याने रामनगर येथे गेले.
अज्ञात व्यक्तींनी मोटार अडवून केली बेदम मारहाण
तिथे अज्ञात व्यक्तीने मोटारीला अडवून वेदांतास खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीच्या कुबड्या घेऊन वेदांतास बेदम मारहाण केली. तसेच लाथा बुक्क्यांनी देखील मारहाण केल्याच तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार भर दिवस घडला असून यात तक्रारदाराच्या अंगावर व्रण उमटले तो गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा - बाजारात फळांना चांगला भाव मात्र, रोगामुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; शेतकरी चिंतेत
हेही वाचा - धक्कादायक..! एक फोटो पाहून केले कॅन्सरचे निदान; उपचाराच्या बहाण्याने महिलेला घातला दीड कोटींचा गंडा!