पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ५ संशयित व्यक्तींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यातील एकूण रुग्णांपैकी हे ३ रुग्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर येत असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी संशयित ५ नागरिकांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्रव्याचे नमूने पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविण्यात आले. त्यापैकी ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात कोरोनाचे 9 रुग्ण... नायडू रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी
संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आणि नातेवाईकांची माहिती घेऊन त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असेही आयुक्त म्हणाले. तर, बाधित नसलेल्या दोन संशयितांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्यातील एकूण रुग्णांपैकी हे ३ रुग्ण असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा - पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२ वर