पिंपरी-चिंचवड (पुणे) - हिंजवडीतील नेरे येथे ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळली ( Three leopard cubs rescued Hinjawadi ) आहेत. त्यांना वनविभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. पंधरा दिवस ते एक महिना वयाची ही पिल्ले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
वनाधिकांऱ्यांनी घेतले ताब्यात -
लहान पिल्लं ही आई शिवाय जगू शकत नसल्याने त्यांना आज पुन्हा आई जवळ सोडण्यात येणार आहे. नेरे गावातील शेतकरी गुलाब जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी असताना कामगारांना तिथे तीन बिबट्यांची पिल्ले आढळली. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती माहिती वनविभागाचे वनरक्षक पांडुरंग कोपकर यांना माहिती देण्यात आली. तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पिल्लांना ताब्यात घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी पौड संतोष चव्हाण, वनरक्षक कोपणार, वनपाल मीरा केंद्रे हे घटनास्थळी दाखल झाले होते.
पिल्लांना आईजवळ सोडण्यात येणार -
बिबट्यांच्या पिल्लांची तपासणी करून त्यांना सुरक्षित पुन्हा त्यांच्या आईजवळ सोडण्यात येणार आहे. असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
परिसरात भीतीचे वातावरण -
बिबट्यांची पिल्ले आढळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र वनविभागाने नागरिकांना भितीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगून खरबदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - RPF Jawan Rescued Passenger : धावत्या रेल्वेत चढताना प्रवासी कोसळला; आरपीएफ जवानांनी वाचवले प्राण