पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात बुधवारी दिवसभरात 371 जण कोरोनामुक्त झाले असून 300 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत. तसेच 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 493 वर पोहचली आहे. पैकी, आतापर्यंत 3 हजार 509 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनातून शेकडो जण बरे होत आहेत. ही बाब समाधानकारक मनाली जात आहे. बुधवारी देखील 371 जण हे कोरोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाले आहे. सुरक्षित अंतर राखणे, गर्दीत न जाणे, प्रत्येकाने मास्क वापरणे अशा सवयींमुळे कोरोना हद्दपार करता येणार आहे. या नियमांचे पालन न झाल्यास येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणू उग्र रूप धारण करू शकतो.
बुधवारी मृत झालेला रुग्ण देहुरोड किवळे (स्त्री, वय-४० वर्ष), काळेवाडी (पुरुष, वय- ८० वर्षें), घरकुल चिखली( पुरुष, वय- ४६ वर्षें), दापोडी (पुरुष, वय- ३६ वर्षें), गांधीनगर, पिंपरी (स्त्री, वय- ४९ वर्षें), धुळे (पुरुष, वय- ६६ वर्षें), बावधन खुर्द पुणे (स्त्री, वय- ६८ वर्षें) येथील रहिवासी आहे