बारामती - तालुक्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर फोंडवाडा ( Baramati Morgaon road ) येथे अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला ( Three died on the spot in an accident ) आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या बाजूने येत चालत येत असलेले दशरथ साहेबराव पिसाळ (वय 62 रा. फोंडवाडा, माळवाडी, तालुका बारामती) त्याच वेळेस मोरगावकडून बारामतीकडे दुचाकीवर निघालेले अतुल गंगाराम राऊत (वय 22 रा. करावागज ता. बारामती) तसेच त्यांची आई नंदा राउत या तिघांचा मृत्यू झाला.
चालक फरार - सदर चारचाकी ही बारामतीहून पुण्याच्या दिशेने निघाली होती तर, दुचाकी पुण्याहून बारामतीच्या दिशेला येत होती. फोडवाडा नजीक हा अपघात झाला असून हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. अपघातानंतर चार चाकी वाहन त्याच ठिकाणी होते मात्र, चालक त्या ठिकाणी नसल्याने पोलिसांनी आता चालकांचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.