पुणे - पिंपरी-चिंचवडमधील पहिले तीन जण कोरोनामुक्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १४ दिवसांनंतरच्या दोन टेस्टमध्ये हे तिघेजण निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. शहरात एकूण १२ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. पैकी, तीन जण बरे झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
आशादायक! पिंपरी-चिंचवडमधील 'त्या' तिघांची दुसरी टेस्ट आली निगेटिव्ह, आज होणार सुटका - पुणे
पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्णाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांचे मनोबल वाढले. त्या तिघांना आज रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय