पिंपरी-चिंचवड - पुण्याच्या आंबेठाण येथे शेतातील खड्ड्यात पडून तीन मुलांचा मृत्यू झाला ( Three children drown in Farm lake ) आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. राकेश किशोर दास (वय- 5), रोहित किशोर दास (वय- 8) आणि श्वेता किशोर दास (वय- 4) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नाव आहेत. ते घटना घडलेल्या ठिकाणी काही अंतरावर राहात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव भिकाजी लांडगे यांच्या शेतात नुकताच एक खड्डा खाणण्यात आला होता. 5- 6 फुटांचा असलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. आज अकराच्या सुमारास तिथे मुले खेळत होती. तेव्हा ते पाण्यात उतरली असावीत असे पोलिसांनी सांगितले आहे. खड्ड्याच्या बाजूला मुलांचे कपडे देखील आढळले आहेत. त्यामुळे ते अंघोळ करायला गेले होते असे त्यांच्या घरच्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे दास कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी केले शेतकऱ्यांना आवाहन - आपल्या गावातील ग्रामस्थांनी आपल्या शेतामध्ये शेतीच्या कामाकरीता अथवा इतर कामाकरीता खड्डे करून ठेवले असतील. ते लवकरात लवकर बुजवून घ्यावे अथवा सदर खड्ड्याच्या चारही बाजूने कुंपण करून घेणे आवश्यक आहे. सध्या चालू असलेल्या पावसामुळे आपण तयार केलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठून त्यामध्ये दुर्घटना घडू शकते. आंबेठाण गावाच्या हद्दीमध्ये शेतात केलेल्या खड्ड्यात पाणी साठून त्यामध्ये नुकतीच दुर्घटना घडली आहे. खड्डे न बुजल्यास तस आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी म्हटले आहे.
राज्यात पावसाचे थैमान - कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.
हेही वाचा - Breaking News : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले़